Jai Shree Ram Song : प्रतीक्षा संपली, ‘आदिपुरुष’चं पहिलं गाणं रिलीज

Jai Shree Ram Song : प्रतीक्षा संपली, ‘आदिपुरुष’चं पहिलं गाणं रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओम राऊत दिग्दर्शित  बहुर्चित आगामी 'आदिपुरुष' लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात प्रभासने राम तर क्रितीने सीता मातेची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपुर्वी ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे ( Jai Shree Ram Song ) रिलीज झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बहुप्रतिक्षित आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांनी अखेरीस ट्रेलरनंतर पहिले गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे बोल 'जय श्री राम' ( Jai Shree Ram Song ) असे आहेत. चित्रपटातील हे गाणे चाहत्याच्या अंगावर काटा आणणारे आहे. मनोज मुंतशिर शुक्ला यांनी हे गाणे लिहिले आहे. तर गाण्याला संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे.

'आदिपुरुष' या चित्रपट रामायणावर आधारित आहे. चित्रपटात साऊथ अभिनेता प्रभासने श्री रामची तर अभिनेत्री क्रितीने सीतामातेची भूमिका साकारली आहे. लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंह तर रावणाच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान दिसणारा आहे. कृष्ण कुमार, राजेश नायर, भूषण कुमार, प्रसाद सुतार आणि ओम राऊत यांची निर्मिती असलेला हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. याआधी रिलीज झालेल्या ट्रेलरने चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आता या चित्रपटातील हे गाणे सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

एका युजर्सने लिहिले आहे की, 'मनोज मुंतशिर शुक्ला सरांनी गाण्यांला दिलेल्या डिव्हाईन लिरिक्सला सलाम.' दुसर्‍या एकाने म्‍हटलं आहे की, 'आदिपुरुषचे निर्माते दररोज अंगावर काटा आणणारे सीन घेवून येत आहेत.  'हे गाणे पिढ्यान् पिढ्या स्मरणात राहील, अशाही कमेंट एका युजर्सने केली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

logo
Pudhari News
pudhari.news