प्रथमेश परब
प्रथमेश परब

Prathmesh Parab : प्रथमेश परबची नवी सुरुवात, नव्या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रथमेश परब लवकरच आपल्या चाहत्यांसाठी एक नवा कोरा सिनेमा घेऊन येत आहे. १४ मे रोजी म्हणजेच मदर्स डे च्या दिवशी प्रथमेश ने आपल्या आगामी चित्रपटाबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. (Prathmesh Parab) मातृदिनाच्या मुहूर्तावर त्याच्या या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. हा चित्रपट आई आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रथमेशला आतापर्यंत आपण रॉम कॉम आणि युवा पिढीवर आधारित चित्रपटात काम करताना पाहिले आहे. मात्र हा चित्रपट त्याने यापूर्वी साकारलेल्या सर्व भूमिकांना छेद देणारा असणार आहे. (Prathmesh Parab)

तूर्तास, या चित्रपटाबद्दल अधिक माहिती हातात आली नसली तरी प्रथमेश ने टाकलेली पोस्ट सर्व काही बोलून जाते. प्रथमेश लिहिले की, "एक नवीन सुरुवात. खूप सुंदर विषय, आणि मातृदिन सोबत या सिनेमाचे खूप गोड नातं आहे." प्रथमेश ने दिलेल्या या कॅप्शन मुळे हा चित्रपट एका वेगळ्याच धाटणीचा असणार आहे, यात वाद नाही. शिवाय प्रथमेश देखील एका वेगळ्या रूपात या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती डेविड नाडर
यांची प्रोडक्शन वन ही संस्था करणार आहे. मोहसीन खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news