उपेंद्र लिमयेची पुन्हा एन्ट्री; ‘फेमस होणारच’ चित्रपटात झळकणार

फेमस होणारच
फेमस होणारच

पुढारी ऑनलाईन : रांगड्या व्यक्तिमत्वाने आणि जबरदस्त अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या अभिनेता उपेंद्र लिमयेबद्दल बोलावं तितकं कमीच. अॅक्शन पट म्हटलं की, उपेंद्र यांचा आतापर्यंतचा अभिनय आणि त्यांचे जबरी बोलणं आठवते. हे सर्व पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी अभिनेते उपेंद्र लिमये प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. 'फेमस होणारच' या आगामी अॅक्शन पटातून अभिनेते उपेंद्र लिमये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'फेमस होणारच' या चित्रपटात उपेंद्र लिमयेसोबत अभिनेता महेश गायकवाड, अक्षया हिंदळकर, पूजा राजपूत, तेजस्विनी सुनील, प्रदीप शिंदे, प्रेम धर्माधिकारी, विजय निकम, अक्षय अशोक म्हस्के या कलाकारांना पाहणे ही रंजक ठरणार आहे. अक्षय नागनाथ गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. हा चित्रपट अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला आहे.

अक्षय नागनाथ गवसाने याच्यांसोबत निर्माते मनोज गवळी, आशिष गुंजेकर, अंकित बजाज यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. लवकरच 'फेमस होणारच' हा अॅक्शन पट मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होणार आहे. यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news