तमन्ना 'लस्ट स्टोरीज २'मध्ये झळकणार? अभिनेत्रीच्या झोळीत बहुभाषिक चित्रपटांचा साठा
पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्व भाषांमध्ये मनोरंजक काम करत असताना अभिनेत्री तमन्ना भाटियाकडे २०२३ मध्ये येणारे काही खास प्रोजेक्ट आहेत. तमन्ना भाटिया तिच्या २०२३ मधील अनेक बहु-भाषिक रिलीजसाठी सज्ज झाली आहे. येत्या वर्षात तिच्याकडे अनेक नवीन प्रोजेक्ट असल्याचं समजतंय.
सुपर टॅलेंटेड अभिनेत्री तमन्ना भाटियासाठी तिच्या कामा मध्ये भाषा कधीच अडथळा ठरली नाही कारण या पॅन-इंडिया स्टारने सर्व इंडस्ट्री मध्ये काम केले आहे आणि हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने स्वत: ची एक वेगळी ओळख संपादन केली आहे. तिच्या चित्रपटांमध्ये काही दमदार परफॉर्मन्स दिले आहेत. आत्तापर्यंत ७३ हून अधिक चित्रपटांचा भाग राहिल्यानंतर, तमन्नाचे २०२३ मधल्या कामाची लिस्ट खूप काही रोमांचक प्रोजेक्टने भरलेली आहे.
बाहुबली मधील राजकुमारी असो किंवा बबली बाउन्सर मधील महिला बाउंसर असो किंवा प्लॅन ए प्लॅन बी मधील मॅचमेकिंग कंपनीची हेडस्ट्राँग हेड असो, तिने तितकेच स्वतःला पात्र बनवले आहे आणि ते पूर्णत्वास नेले आहे. २०२३ मधील तिचे प्रोजेक्ट नक्कीच अफलातून आहेत. तमन्ना आता आपल्याला मल्याळम चित्रपट “बांद्रा” मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे तेलुगुमध्ये “भोला शंकर”, तामिळमध्ये “जेलर” हे दोन हिंदी आगामी चित्रपट आहेत. लस्ट स्टोरीजचा दुसरा भाग आणि जी कर्दा देखील दिसणार असल्याचे समजते. पण तमन्नाच्या वेगवेगळ्या भूमिका नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहेत, यात शंका नाही.