fatafati Movie : ‘फटाफटीसाठी’ रिताभरी चक्रवर्तीने वाढवले तब्बल २५ किलो वजन | पुढारी

fatafati Movie : 'फटाफटीसाठी' रिताभरी चक्रवर्तीने वाढवले तब्बल २५ किलो वजन

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिताभरी चक्रवर्ती तिचा बहुप्रतिक्षित फटाफटी चित्रपट प्रदर्शनास तयारीत आहे. (fatafati Movie) या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीची भूमिका रिताभरीने साकारलीय. एका ओव्हर वेट असलेल्या महिलेच्या भूमिकेत ती आहे. विशेष म्हणजे, रीताभरीने या चित्रपटासाठी तब्बल २५ किलो वजन वाढवले होते. त्यामुळे भूमी पेडणेकरच्या दम लगा के हैशा सारखा लूक यामध्ये रिताभरीने दिसत आहे. (fatafati Movie)

तिच्या आहार आणि व्यायामाविषयी अधिक माहिती देताना ती म्हणते, “वजन वाढवणं सोपं वाटतं पण ते नक्कीच नाही. मी वजन वाढवण्याच्या प्रवासात असताना, शेवटच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कष्ट करावे लागले.”

अभिनेत्रीने तिच्या नव्या भूमिकेसाठी एक खास फोटो शूट देखील केलं.

फटाफाटीचे दिग्दर्शन अरित्रा मुखर्जी यांनी केले आहे. ती पहिल्यांदाच अबीर चॅटर्जीसोबत काम करणार आहे आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री स्वस्तिका दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत आहे. कथा आणि पटकथा झिनिया सेन यांची आहे आणि संवाद साम्राग्नी बंदोपाध्याय यांनी दिले आहेत. हा चित्रपट १२ मे २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

Back to top button