Adipurush Trailer Leaked : काही तास आधीच प्रभास- क्रितीच्या ‘आदिपुरुष’ चा ट्रेलर लीक

prabhas aadipurush film
prabhas aadipurush film

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्ता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनॉनचा आगामी 'आदिपुरुष' या चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपट येत्या १६ जुन २०२३ रोजी चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर ९ मे म्हणजे, आज मुंबईत दुपारी ३.३० वाजता रिलीज होणार होता. मात्र, त्याच्या आधीच काही तास चित्रपटाचा ट्रेलर ऑनलाईन लीक ( Adipurush Trailer Leaked ) झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लीक होताच चाहत्यांनी सोशल मीडियावर कॉमेन्टसचा पाऊस पडला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावरील ट्रेलरची क्लिप शेअर करणाऱ्यांना ती हटवण्याची विनंती केली जात आहे.

खरं तर, 'आदिपुरुष' च्या निर्मात्यांनी सोमवारी हैदराबादमधील एएमबी सिनेमा थियटरमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होते. या स्क्रीनिंगला प्रभाससोबत क्रिती सेनॉन, दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपटाचे सह-निर्माता भूषण कुमार यांनी हैदराबादमध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी चाहत्यांची भेट घेवून आता या हिंदी भाषेचा ट्रेलर मुंबईत ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर आज मुंबईत चित्रपटाचा दुपारी ३.३० वाजता ट्रेलर रिलीज होणार होता. याआधीच काही तास ट्रेलर आनलाईन लीक झाला. यानंतर चाहत्यांना ट्रेलर पसंतीस उतरलाय. यामुळे सोशल मीडियात एकच खळबळ माजली.

स्क्रीनिंगदरम्यान प्रभास साध्या पांढऱ्या कुर्त्यामध्ये तर क्रिती पेस्टल निळ्या-हिरव्या अनारकलीत ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. ट्रेलरमध्ये क्रिती प्रभासच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसत आहे. तर व्हिडीओच्या शेवटी ओम राऊत 'जय श्री राम' म्हणताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट १६ जूनला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. ( Adipurush Trailer Leaked )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news