विमानतळावर सेल्फी काढणाऱ्यावर भडकला शाहरुख; चाहते म्हणाले, "गर्विष्ट... | पुढारी

विमानतळावर सेल्फी काढणाऱ्यावर भडकला शाहरुख; चाहते म्हणाले, "गर्विष्ट...

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स-ऑफिसवर धुमाकूळ घातला. शाहरुख खान नुकताच मुंबईच्या विमानतळावर स्पॉट झाल्याने त्याच्या फॅन्सनी एकच गर्दी केली. यावेळी एका फॅनने शाहरूखसोबत सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असताना शाहरूख त्याच्यावर भडकला. त्‍याने चाहत्‍याच्‍या हातातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्या बॉडीगार्डने चाहत्‍याला ढकलत बाजूला केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे.

‘पठाण’ चित्रपटाच्या यशानंतर  शाहरूख खान नुकताच मुंबई विमान तळावर स्पॉट झाला. शाहरूखला पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. यावेळी त्याने ब्लॅक कलरचा टी-शर्ट आणि ब्लॅक कलरची कार्गो पॅट परिधान केला हाेता. शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानी त्याच्यासोबत होती. दरम्यान, एक फॅन शाहरूखसोबत सेल्फी काढण्यासाठी जवळ आला.तो त्याच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात शाहरूख फॅन्सच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा आणि फोटो न काढताच पुढे जातो. दरम्यान त्याचे बॉडीगार्ड येवून फॅन्सला बाजूला करतात. या घटनेचा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी शाहरूखचे पठाण चित्रपटाच्‍या यशासाठी भरभरून कौतुक केलं. तर दुसरीकडे त्याच्या या व्हिडिओतील वागण्याने चाहत्याच्यात कॉमेन्टचा पाऊस पाडलाय. ‘शाहरूखने असे वागायला नको होतं?’. ‘याला काय कळत की नाही?’, ‘पठानमुळे गर्विष्ट झाला आहे काय?’ यासारख्या कॉमेन्टस नेटकऱ्यांनी केल्या आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, शाहरुख राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये तो बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button