Met Gala 2023: मेट गालाच्या रेड कार्पेटवर झुरळाचा डेब्यू! (Video)

cockroach on met gala carpet
cockroach on met gala carpet
Published on
Updated on

फॅशन इव्हेंट मेट गाला २०२३ सुरू झाला आहे. या सोहळ्यात अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी सहभागी झाले होते. प्रसिद्ध सेलिब्रिटी रेड कार्पेटवर अदा दाखवताना दिसले. (Met Gala 2023) या स्टार्सच्या पेहराव, फॅशन आणि स्टाईलच्या चर्चा आहेतच, सोबतच एक झुरळही चर्चेत आहे. वाचून आश्चर्य वाटले ना! यावेळी मेट गालाच्या रेड कार्पेटवर एक झुरळही दिसला. इतकंच नाही तर कोणत्याही फिल्मस्टारप्रमाणे अनेक फोटोही क्लिक करण्यात आले. (Met Gala 2023)

फोटोग्राफरनी क्लिक केले फोटो

मेट गाला २०२३ न्यूयॉर्क शहरात सुरू झाला आहे. जगभरातील प्रसिद्ध स्टार्स रेड कार्पेटवर पोज देताना दिसले. एका झुरळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भव्य फॅशन इव्हेंटमध्ये, जेव्हा सेलिब्रिटीज त्यांच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोग्राफर्ससाठी जोरदार पोज देत होते, तेव्हा तिथे एक झुरळही रेंगाळत आला. गाला इव्हेंटच्या रेट कार्पेटवर झुरळ पाहून छायाचित्रकाराला ते आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यापासून रोखता आले नाही. झुरळांचे फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्या फोटोग्राफरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाला

या झुरळाने रेड कार्पेटवर 'डेब्यू' करताच फोटोग्राफर्सनी कॅमेरे घेऊन पळ काढला. इतकेच नाही तर तेथे उपस्थित असलेले लोकही जोरजोरात ओरडू लागले. हे दृश्य पाहून सर्वजण झुरळाला प्रोत्साहन देत असल्याचा भास झाला. या सोहळ्यात उपस्थितांमध्ये अभिनेते, संगीतकार, मॉडेल आणि फॅशन जगतातील दिग्गजांचा समावेश होता.

video – domSAW TAYLOR twitter 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news