Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan १०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ १०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ ईदच्या औचित्याने २१ एप्रिल रोजी रिलीज झाला होता. किसी का भाई किसी की जानने जवळपास ९३ कोटींची कमाई केली होती. आता किसी का भाई किसी की जान हा १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. १०० कोटींहून अधिक कमाईकडे चित्रपटाची वाटचाल सुरु आहे. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan)
‘किसी का भाई किसी की जान’ चे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केलं आहे. चित्रपटाची निर्मिती स्वत: सलमान खानने केलीय. ‘किसी का भाई किसी की जान’ मध्ये सलमान खान शिवाय पूजा हेगडे, दग्गुबाती वेंकटेश, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल आणि पलक तिवारी यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.
- Met Gala : मेट गालाच्या रेड कार्पेटवर प्रियांका राज! निक जोनाससोबत लक्षवेधी लूक
- Delhi Excise Policy Case : ईडीच्या आरोपपत्रात राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचं नाव
- Get Together Movie : शंकर महादेवन यांच्या आवाजातील “वाटा दूर जाती” ऐकलं का?
View this post on Instagram