Emraan Hashmi : गँगस्टर सिनेमाला १७ वर्षे पूर्ण, इमरानचा ;तो; अभिनय आजही आठवतो | पुढारी

Emraan Hashmi : गँगस्टर सिनेमाला १७ वर्षे पूर्ण, इमरानचा ;तो; अभिनय आजही आठवतो

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने बॉलीवूडमधील (Emraan Hashmi) त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक उत्तोत्तम कामे केली आहेत आणि अनेक पात्र साकारली आहेत. “गँगस्टर” हा सिनेमा नक्कीच त्याच्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडून जातो. आज गँगस्टर चित्रपटाला १७ वर्षे पूर्ण होत आहेत. २००६ मध्ये रिलीज झालेल्या, या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौतने पदार्पण केलं होतं. त्यात शायनी आहुजा मुख्य भूमिकेत होता. (Emraan Hashmi)

चित्रपटाला १७ वर्षे पूर्ण झाल्यामुळे इम्रानने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणतो “गँगस्टर हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे आणि त्याचा इतका मोठा प्रभाव पडेल हे मला माहीत नव्हते. बॉलीवूडमध्ये हा चित्रपट क्लासिक बनला. त्यासाठी प्रेक्षकांचे आणि माझ्या टीमचे खूप खूप आभार. हा एक असा चित्रपट आहे जो माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि तो नेहमीच माझा आवडता असेल.”

गँगस्टर हा इमरानचा दिग्दर्शक अनुराग बासूसोबतचा तिसरा चित्रपट होता. हा चित्रपट व्यावसायिक यशस्वी ठरला आणि त्याच्या अभिनय, दिग्दर्शन आणि संगीतासाठी समीक्षकांची प्रशंसाही झाली. इमरानच्या पात्राला सर्वाधिक प्रेम मिळाले.

अलीकडे, इमरान हा अक्षय कुमार सोबत सेल्फी चित्रपटामध्ये दिसला होता. तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला. आता चाहते इम्रानच्या नव्या प्रोजेक्टसाठी वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

Back to top button