नवा गडी नवं राज्य : अदितीची काही क्षणांची भेट बदलेल का आनंदीचे आयुष्य! | पुढारी

नवा गडी नवं राज्य : अदितीची काही क्षणांची भेट बदलेल का आनंदीचे आयुष्य!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘नवा गडी नवं राज्य’ ह्या मालिकेचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. जेव्हापासून ह्या मालिकेची सुरुवात झाली, त्या क्षणांपासून या मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद आणि प्रेम दिले. अभिनेत्री अदिती सारंगधर ही खूप नावाजलेली अभिनेत्री असून तिने वेगवेगळ्या मालिकेतून आणि चित्रपटातून आपली छाप सोडली आहे. तिचा या मालिकेत कॅमिओ रोल दाखवला जाणार आहे.

अदितीचे पात्र खूप साध्या सरळ गृहिणीचे आहे. प्रेक्षकांनी नुकतेच प्रोमोमध्ये बघितले की, आनंदी मोदक द्यायला एका घरात जाते आणि तिला त्या घरातली स्त्री आतमधून थांबा हं, बस असे सांगते. कारण ती घरकामात बिझी असते, हे बघून आनंदीला खूप वाईट वाटते आणि जाणीव होते की, मी पण आपल्या माणसांसाठी असेच करायचे आणि आता ते मी करूच शकत नाही. तिची ही घालमेल अदितीच्या लक्षात येते आणि ती आनंदीला एक मोलाचा सल्ला देते. अदितीचा हा सल्ला आनंदीच्या आयुष्याला कलाटणी देईल का?

Back to top button