मी होणार सुपरस्टारची स्पर्धक कोमल सुर्वेच्या करिअरला मिळाली नवी दिशा

komal surve
komal surve
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा' कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. बच्चेकंपनीचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. कॅप्टन फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे छोटे दोस्त मंचावर नवनवे प्रयोग सादर करत आहेत. वैभव घुगे आणि फुलवा खामकर यांच्यासोबतच आणखी एक नृत्यदिग्दर्शिका सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आणि ती आहे कोमल सुर्वे.

मी होणार सुपरस्टारच्या याआधीच्या पर्वात मंचावर कोमल महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. नृत्यदिग्दर्शिका होण्याचं तिचं स्वप्न याच मंचामुळे साकार झालं आहें. ज्या मंचावर स्पर्धक म्हणून टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली त्याच मंचावर मी आता स्पर्धकांना शिकवते आहे. ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या मंचाने खूप गोष्ट शिकवल्या. आठवणीत राहणाऱ्या असंख्य क्षणांचा हा मंच साक्षीदार आहे. त्यामुळे या मंचावर पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते आहे हे सुखावणारं आहे.

वयाच्या ५ व्या वर्षी कोमलने नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. आईच्या पुढाकाराने गुरु रत्नाकर शेळके यांच्याकडे कोमलने नृत्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. बॉलीवूड आणि लोकनृत्य शिकल्यानंतर कोमलने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली.

इतकंच नाही तर लॅटिन स्टाईल, कण्टेम्पररी, जॅझ असे नृत्याचे विविध प्रकार कोमलने आत्मसात केले. अनेक रिॲलिटी शोच्या मंचावर तिने ग्रुपमध्ये आपलं टॅलेंट दाखवलं. मात्र स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार कार्यक्रमामुळे ती प्रकाशझोतात आली. कोमलच्या परिवारात सर्वांनाच कलेची आवड आहे. मात्र कोमलने नृत्याची आवड करिअर म्हणूनच पुढे नेण्याचं ठरवलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news