John Abraham : जॉनने सोडला मोठा बिग प्रोजेक्ट?; कारण आहे ‘पठाण’ | पुढारी

John Abraham : जॉनने सोडला मोठा बिग प्रोजेक्ट?; कारण आहे 'पठाण'

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचे ( John Abraham ) काही दिवसांपासून अनेक चित्रपट फ्लॉप होत होते. दरम्यान त्याला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा ‘पठाण’ मिळाला आणि त्याच्या करिअरला नव्याने चालना मिळाली. चित्रपटातील अभिनयामुळे सध्या शाहरूखसोबत जॉनच्या नावाचीदेखील चर्चा रंगू लागली. परंतु, याच दरम्यान जॉनने ‘आवारा पागल दीवाना २’ (Awara Paagal Deewana २) मोठ्या प्रोजेक्टला नकार दिल्याचे वृत्त समोर आले आहे. या चित्रपटाला नकार देण्याचे कारण म्हणजे, जॉनला कॉमेडी चित्रपटात रस नव्हता. त्यामुळे त्याने पठाणला सहमती दर्शविल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जॉन अब्राहमने ( John Abraham ) याआधी ‘आवारा पागल दीवाना २’ हा चित्रपट करण्यास होकार दिला होता. कारण या चित्रपटाचे दिग्दर्शिन साजिद खान करणार होता. या चित्रपटासाठी साजिदने जॉन अब्राहमची निवड केली होती. मात्र, काही दिवसांतच जॉनने हा चित्रपट करण्यास नकार दिला.

दरम्यान जॉनने हा चित्रपट करण्यास का नकार दिला याची अधिकृत्त माहिती मिळालेली नाही. पण यामागे ‘पठाण’ चित्रपट हे एक कारण असल्याचं बोललं जात आहे. ‘पठाण’ चित्रपटातील स्वत: च्या अभिनयाबद्दल खूपच उत्सुक होता. त्याने व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. तर काही दिवस कॉमेडी चित्रपट करण्याऐवजी त्याला अॅक्शन, गंभीर आणि बिग प्रोजेक्ट चित्रपट करायचे होते. त्यामुळे त्याने नकार दिला असावा असेही बोलले जात आहे.

‘पठाण’ च्या यशानंतर जॉनला अनेक मोठ्या अॅक्शन चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या आहेत. जॉनचा आगामी ‘तेहरान’ हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस रिलीज होण्याची शक्यता आहे. तर जॉनचा जियोपॉलिटिक्सवर आधारित अनटायटल चित्रपटदेखील येणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button