बिग बॉस मराठीत आदिश वैद्य स्वीकारणार पॉवर कार्ड

बिग बॉस मराठीत आदिश वैद्य स्वीकारणार पॉवर कार्ड

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बिग बॉस मराठीच्या घरामधून काल रविवारच्या भागात एक सदस्य घराबाहेर पडला. तर, एका नव्या सदस्याची एंट्री घरामध्ये झाली. काल अक्षय वाघमारेला घराबाहेर पडावे लागले. तर बिग बॉस मराठीमध्ये सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एंन्ट्री आदिश वैद्य याला मिळाली आहे.

आज सोमवारच्या भागात आदिश वैद्य बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणार आहे. पण, त्याआधीच बिग बॉस त्याला एक कठीण असे कार्य सोपविणार आहेत. बिग बॉस आदिशला बहुमूल्य कठिण कार्य स्वीकारण्याची सुवर्णसंधी देणार आहेत. आणि ते कठिण कार्य आहे पॉवर कार्ड.

या पॉवर कार्डद्वारे घरातील कोणता सदस्य कोणते काम करणार? याची विभागणी करण्याचा अधिकार आदिशकडे असणार आहे. ज्यामुळे दिवसभरातील कारभारावर आदिशचं वर्चस्व असेल. पण आता हे temptation स्वीकारल्यास परिणाम स्वरूप या पॉवर कार्डची किंमत घरातील सदस्यांना मोजावी लागणार आहे.

आदिशने पॉवर कार्डचा स्विकार करणार का? आणि घरातील स्पर्धकावर कसे लक्ष ठेवणार का? हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याशिवाय बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे.

त्यामुळे आता बघूया आदिश घराचे पहारेकरी होण्यासाठी कोणत्या तीन सदस्यांची नावे देतो ते आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन ३ हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद – विवादाने घर गाजवत आहेत. इथं अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये ग्रुप्स देखील तयार झाले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते.आता अक्षय वाघमारे घराबाहेर गेला आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : अभिनेता अजिंक्यसोबत नवरात्रीचे नऊ प्रश्न | मला सई आवडते | नवरात्री विशेष

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news