मोनालिसा बागल हिचं ‘जीव झाला बाजिंद’ गाणं भेटीला

monalisa bagal
monalisa bagal

अभिनेत्री मोनालिसा बागल प्रेक्षकांसाठी म्युझिकल भेट घेऊन आली आहे. 'जीव झाला बाजिंद'… हे तिचे नवे गाणे रिलीज झालं आहे. टीव्ही आणि सिनेमात झळकणारी  मोनालिसा बागल हिच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आले आहे.

मोनालिसाने आतापर्यंत वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. आता पुन्हा एकदा एका वेगळ्या गाण्यातून ती प्रेक्षकांसमोर आली आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचं, गावरान बाज असलेल्या 'जीव झाला बाजिंद' या गोड आणि नव्या गाण्यात मोनालिसा बागल दिसणार आहे. गावाकडची प्रेम कथा सांगणाऱ्या या गाण्यात मोनालिसा सोबत अभिनेते विठ्ठल काळे झळकणार आहेत.या गाण्याच्या निमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीत एक नवीन जोडी दिसणार आहे.

विठ्ठल काळे आणि मोनालिसा बागल या दोघांची गावातली केमिस्ट्री नक्कीच सर्वांच्या मनात घर करेल. असा विश्वास गाण्याचे दिग्दर्शक शुभम गोणेकर यांनी व्यक्त केला. या गाण्याचे शब्द बारामतीच्या निलेश धुमाळ यांनी लिहिले आहे. स्वरसाज मयूर सुकाळे यांनी दिला आहे. तर संगीत संकेत शिर्के यांनी दिले आहे. या गाण्याचे संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले आहे. पाहा 'जीव झाला बाजिंद' हे गाणं 'मराठी Originals' या यूट्यूब चॅनेलवर…

हेदेखील वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news