Shahid-Kriti : शाहिद-क्रितीच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज; दोघे रोमँटिक अंदाजात

Shahid-Kriti : शाहिद-क्रितीच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज; दोघे रोमँटिक अंदाजात

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर त्याच्या अनेक चित्रपटामुळे चर्चेत असतो. शाहिदची 'फर्जी' ही वेबसिरीज गेल्या फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांच्या पसंतीस उतरला. यानंतर चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान शाहिदच्या अनटायटल चित्रपटातील रोमँटिक अंदाजातील पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात शाहिदसोबत क्रिती सेनॉन ( Shahid-Kriti ) दिसत आहे.

अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या ( Shahid-Kriti ) आगामी अनटायटल चित्रपटातील रोमँटिक लव्हस्टोरीचे पहिले पोस्टर क्रितीच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोत शाहिदने व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू कलरची जिन्स परिधान केली आहे. तर क्रितीने शॉर्ट मिनी ड्रेसनं चारचाँद लावले आहेत. यावेळी खास करून दोघेजण एका बाईकवर रोमँटिक अंदाजात बसलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'Announcing the wrap of our impossible love story!?❤️' असे लिहिले आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाचे नाव निर्मात्यानी ठेवलेले नाही.

हे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज होताच चाहत्यांनी शाहिद आणि क्रितीवर भरभरून प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केलाय. हा चित्रपट ऑक्टोबर २०२३ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामुळे शाहिद आणि क्रितीला एकत्रित पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. क्रिती या चित्रपटात रोबोटची तर शाहिद एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news