

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेते सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट किसी का भाई किसी की जानचे (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. आता या पोस्टरची चर्चा होऊ लागलीय. चाहते सलमान खानच्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, सलमानने चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज डेटची घोषणा केलीय. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan)
जानेवारीमध्ये या चित्रपटाचे टीजर समोर आले होते. आता चित्रपटातीव नवी गाणीही रिलीज झाली आहेत. सलमानने सोशल मीडियावर एक मोशन पोस्ट शेअर करत सांगितले आहे की, चित्रपटाचा ट्रेलर १० एप्रिल रोजी रिलीज होत आहे.