नीता अंबानीच्या कार्यक्रमात २४ कॅरेट सोन्याची चर्चा; डिझायनरने लावले चारचाँद

२४ कॅरेट
२४ कॅरेट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा कार्यक्रमाचा समारोप झाला असून रेड कार्पेटवरील एकापेक्षा एक दिग्गज कलाकार चर्चेत येत आहेत. रेड कार्पेटवर केवळ बॉलिवूड स्टार्स नव्हे तर हॉलिवूडच्या कालारांनी दमदार हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर सुहानी पारेख हिच्या २४ कॅरेट सोन्याच्या ड्रेसनं सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

डिझायनर सुहानी पारेख हीने २४ कॅरेट सोन्याचा ड्रेस परिधान करून कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी हजेरी लावली. यावेळी सुहानीने परिधान केलेल्या सोन्याच्या ड्रेसनं चाहत्याचे लक्ष वेधून घेतले. सुहानी प्रेग्नेंट असून ती लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. दरम्यान, तिने निता अबांनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावत बेबीबंप फोटोशूट केले आहेत. यावेळी तिने स्वत: च्या बाळाला कवच म्हणून सोन्याची बेली आर्मर परिधान केले आहे. सुहानीने यावेळचे काही खास फोटो स्वत: इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोला तिने '24k golden baby (bump) ✨ MISHO couture for the @nmacc.india gala ⚡️' अशी कॅप्शन लिहिली आहे. या ड्रेससोबत तिने कानात झुमके, नेकपीस आणि हातात सोन्याच्या अंगठ्या घालून लूक पूर्ण केला आहे. ब्लॅक रंगाच्या साडीवर तिने हा लूक केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहेत.

सुहानीचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. या फोटोला आतापर्यंत ११ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या लाँचिंगला परदेशातील कलाकार, बॉलिवूड कलाकार, राजकिय नेते, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर अशा अनेकांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news