यार, तू मुलांना उत्तम घडवलेस | पुढारी

यार, तू मुलांना उत्तम घडवलेस

अभिनेता शाहरूख खान नेहमीच चर्चेत असतो. पठाण सिनेमाच्या यशामुळे शाररूखच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. त्यानंतर नुकताच खान कुटुंबाची एक झलक अंबानींचा एका सांस्कृतिक कार्यक्रमात पाहायला मिळाली. लवकरच गौरी खानचे नवे पुस्तक प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र गौरीच्या नव्या पुस्तकाची चर्चा रंगत आहे. याच दरम्यान गौरीने नव्या पुस्तकानिमित्त सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. पत्नीच्या फोटोवर शाहरूखची कमेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गौरीने सोशल मीडियावर कुटुंबासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. कुटुंबामुळे घर बनते, पेंग्विन इंडिया कॉफी टेबल बुक पुस्तकासाठी उत्सुक आहे, अशी पोस्ट गौरीने केली आहे. गौरीच्या या पुस्तकावर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंटस् केल्या आहेत. या पोस्टवर शाहरूख म्हणतो, यार गौरी तू किती उत्तम मुलांना घडवले आहेस! सध्या अभिनेत्याच्या कमेंटचीही प्रचंड चर्चा गौरी आणि शाहरूख यांना सुहाना, आर्यन आणि अबराम अशी तीन मुले आहेत. सध्या सर्वत्र गौरी खान हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे. इंटिरियर डिझायनर गौरी लवकरच माय लाईफ इन डिझाईन नावाचे नवीन कॉफी टेबल बुक लाँच करणार आहे.

Back to top button