पुढारी ऑनलाईन डेस्क - जस्टिस हेमा कमेटीचा रिपोर्ट आल्यानंतर मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीमध्ये खूप गोंधळ निर्माण झाला. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. मागील काही दिवसात अभिनेते निविन पॉलीवर एका महिलाने लैंगिक शोषणाचा आरोप करत केस दाखल केली होती.
आता या गंभीर प्रकरणानंतर तमिळ चित्रपट, टीव्ही आणि स्टेज कलाकारांचे प्रतिनिधीत्व करणारी संघटना ‘नदीगर संगम’ने बुधवारी अंतर्गत समितीची बैठक घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संघटनेने एक प्रस्ताव पारित केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, जेंडर संवेदनशीलता आणि अंतर्गत समितीकडून तमिळ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पीडितांसाठी सर्व प्रकारची कायदेशीर मदत केली जाईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रस्तावात पुढे म्हटले आहे की, ‘जर कोणत्याही महिलेकडून लैंगिक शोषण वा अन्य संबंधित विषयावर कोणतीही तक्रार आली तर त्याचा पूर्णपणे तपास व्हायला पाहिजे. जर तपासात निष्पन्न झाले तर चित्रपट निर्माता संघ गुन्हेगारांना चित्रपट इंडस्ट्रीतून ५ वर्षांसाठी बंदी करण्याची शिफारस करेल.’
बुधवारी, जेंडर संवेदनशील आणि नदीगर संगमच्या अंतर्गत समितीने बैठकीनंतर हे देखील म्हटले की, महिला पीडिता आपली तक्रार संघटनेच्या समक्ष एका फोन नंबरच्या माध्यमातून देखील दाखल करू शकते.
हा नंबर आधीच ठेवण्यात आला आहे. याशिवाय, यासाठी एक नवे ईमेल आयडी देखील बनवण्यात आले आहे. नदीगर संगमने प्रस्तावात पुढे म्हटले आहे की, याद्वारे 'त्यांनादेखील मदत केली जाईल, जे यूट्यूब चॅनल्सच्या कंटेंटच्या विरोधात तक्रार दाखल करू इच्छितात.’
नदीगर संगमने आपल्या स्टेटमेंटमध्ये पुढे म्हटलंय- ‘कलाकारांच्या संघटनेने पीडितेने आपल्या तक्रारीबाबत मीडियाशी बातचीत करण्याआधी थेट संघटनेशी संपर्क करावं.’
तमिळ चित्रपट इंडस्ट्रीसाठी हे पाऊल यासाठी उचलण्यात आले आहे, कारण मल्याळम इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर सेक्सुअल हॅरेसमेंटची घटना समोर आल्या आहेत.