‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेत सुयश टिळक वेगळ्या भूमिकेत!

जिवाची होतिया काहिली
जिवाची होतिया काहिली

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील 'जिवाची होतिया काहिली' ही मालिका मराठी आणि कानडी यांच्यातील प्रेम कथेवर भाष्य करणारी आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे आणि अभिनेत्री प्रतीक्षा शिवणनकर हिचा कानडी अंदाज चाहत्यांना आवडत आहे. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी 'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत पाहायला मिळत आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. दरम्यान आता मालिकेत कार्तिक देवराज या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहे.

कार्तिक देवराज गावातला सरकारी अधिकारी असून कोकटनूर यांच्यावर त्याची जबाबदारी असेल. कार्तिक देवराज याची भूमिका अभिनेता सुयश टिळक साकारत आहे. अर्जुन आणि कार्तिक देवराज यांची चांगली मैत्री असेल, पण कार्तिक देवराज ही नकारात्मक व्यक्तिरेखा साकारणार आहे. तो रेवथी आणि अर्जुन यांच्यात फूट पडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. कार्तिक देवराज याच्या येण्याने रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम होणार?, हे पाहणे उत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news