‘पठाण’ आणि ‘खलनायक’ सोबत दिसणार | पुढारी

‘पठाण’ आणि ‘खलनायक’ सोबत दिसणार

बॉलीवूडचा बाबा संजय दत्त आणि शाहरूख खान सोबत काम करणार असून त्यामुळे प्रेक्षकांना अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी 2007 साली आलेल्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातल्या एका गाण्यात संजय आणि शाहरूख खानने एकत्र डान्स केला. याशिवाय 2012 ला आलेल्या ‘रा-वन’ सिनेमात संजूबाबाने शाहरूखसोबत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. आता हे दोघे पहिल्यांदाच पुन्हा एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. हा चित्रपट म्हणजे ‘जवान’. ‘जवान’चे दिग्दर्शक आधी ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला ‘जवान’साठी कास्ट करत होते. मात्र, त्याने ‘जवान’मध्ये काम करण्यास नकार दिला. आता अल्लू अर्जुन नंतर दिग्दर्शक संजय दत्तला कास्ट करण्याच्या विचारात आहेत. संजय दत्त सध्या काश्मीरमध्ये ‘लिओ’चे शूटिंग करत आहे, पण तो लवकरच मुंबईला परतणार असून शाहरूख खानची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. ‘जवान’ एक अ‍ॅक्शन एंटरटेनर आहे. जून 2023 मध्ये ‘जवान’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Back to top button