shradha kapoor – हातात दारूचा ग्लास, सोबत बोल्ड अंदाज (Video) | पुढारी

shradha kapoor - हातात दारूचा ग्लास, सोबत बोल्ड अंदाज (Video)

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर या फ्रेश जोडीचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. यात श्रद्धाचा बोल्ड अंदाज दिसून येत असून त्यातील एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. मात्र, नेटकर्‍यांनी त्यावरून श्रद्धाला चांगलेच ट्रोल केले आहे. गाण्यामध्ये श्रद्धाने बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. मैने पी रखी है, असे या गाण्याचे शब्द आहेत. श्रद्धाने इन्स्टाग्रामवर गाणे शेअर करताच तिला ट्रोल केले जात आहे. एकाने लिहिले आहे, हे गाणे म्हणजे बकवास आहे. या चित्रपटामधील आणखीन किती खराब गाणी येणार आहेत, असेही एकाने लिहिले आहे. काहींनी तिच्या लूकवर कमेंट केली आहे. तिला पारंपरिक कपडे चांगले वाटतात, असे एकाचे म्हणणे आहे. बाकी काहीही असले तरी श्रद्धाचा हा चित्रपट तिकीटबारीवर भरपूर गल्ला जमवत असून त्यामुळे ती खूश आहे. रणबीर आणि श्रद्धाबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट.

Back to top button