Project K : दीपिकाने घेतले इतके कोटी तरी! ‘पठान’पेक्षा कमीच! | पुढारी

Project K : दीपिकाने घेतले इतके कोटी तरी! 'पठान'पेक्षा कमीच!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात बिझी अभिनेत्रींपैकी एक दीपिका पादुकोण आहे. पठानमुळे तिचा करिअरचा आलेख उंचावला आहे. दीपिका पादुकोणचा पुढील चित्रपट ‘प्रोजेक्ट के’चे (Project K ) शूटिंग सध्या सुरु असून या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास सोबत ती दिसणार आहे. तुम्हाला माहितीये का, या चित्रपटासाठी दीपिका पादुकोणने किती मानधन घेतले आहेत. (Project K )

दीपिका पादुकोणकडे यंदा अनेक इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स आहे. त्यापैकी एक आहे-प्रोजेक्ट के. या चित्रपटासाठी दीपिकाने कोट्यवधी रुपये घेतले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्य माहितीनुसार, दीपिकाने १० कोटींहून अधिक रक्कम घेतल्याचे म्हटले जात आहे.

करिअरच्या दृष्टिकोनातून ही वेळ दीपिका पादुकोणसाठी खूप इंटरेस्टिंग आहे. चित्रपटाशिवाय, तिच्याकडे अनेक बिग ब्रँड्स देखील आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर दीपिका पादुकोणने आपली एक वेगळी ओळख बनवलीय. फीफा विश्व कप आणि पॅरिस फॅशनमध्ये तिने उपस्थिती लावली. आता ती ॲकॅडमी ॲवॉर्ड्स २०२३ मध्ये प्रेंझेंटर होणार आहे.

दीपिका पादुकोणचा ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. आता प्रोजेक्ट केदेखील तितकाच यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा निर्मात्यांना वाटत आहे. दीपिकाने पठानसाठी १५ कोटी रुपये मानधन घेतले होते. पण, प्रोजेक्ट के साठी तिने १० कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

Back to top button