Shraddha Kapoor : श्रद्धाला पैदा दिवसाच्या शुभेच्छा !

Shraddha kapoor
Shraddha kapoor

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या मराठमोळ्या अंदाजासाठी ओळखली जाते. तिला मराठी संस्कृतीबद्दल खूप प्रेम आहे. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्याने तिला मराठीतून शुभेच्छा दिल्या. त्या पाहून श्रद्धा खूपच आनंदित झाली आहे.

श्रद्धा सध्या तिच्या आगामी 'तू झुठी मै मक्कार' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी देखील तिने सुट्टी घेतली नाही. ती प्रमोशनच्या निमित्ताने एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिने तिचा वाढदिवस चाहत्यांबरोबर साजरा केला. तिने तिचा केक कापलेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

या पोस्टवर तिच्या एका चाहत्याने तिला मराठीतून शुभेच्छा दिल्या. मराठीमध्ये 'पैदा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!' अशी कमेंट एका चाहत्याने दिली आहे. ही कमेंट वाचताच श्रद्धाला फार आनंद झाला. लगेचच तिने या कमेंटला रिप्लाय आणि थैंक यू! मराठीत नेहमीच एक्स्ट्रा स्पेशल !

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news