तब्बूच्या कॅमिओची चर्चा | पुढारी

तब्बूच्या कॅमिओची चर्चा

शाहरूख खानच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मै हूँ ना’ या चित्रपटात तब्बूने केलेल्या कॅमिओची (पाहुणी कलाकार) सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तब्बूने केवळ काही सेकंदांसाठी एक कॅमिओ केला होता. तब्बूसारख्या बड्या अभिनेत्रीने कमी वेळेसाठी हा कॅमिओ का केला? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एका नेटकऱ्याने या चित्रपटातील तब्बूचा हा छोटा सीन शेअर करत यामागचे कारण विचारले. या फोटोवर ‘मै हैं ना’ची दिग्दर्शिका फराह खानने उत्तर दिले आहे. तब्बूने काही सेकंदाच्या कॅमिओसाठी होकार कसा दिला, यावर फराह म्हणाली, त्यावेळी तब्बू दार्जिलिंगमध्ये तिच्या एका वेगळ्या शूटसाठी आली होती. त्यामुळे ती मला ‘मैं हूँ ना’च्या सेटवर भेटायला आली होती. तेव्हा मीच तिला त्या एका शॉटसाठी उभे केले. आढेवेढे न घेता ती स्वतःचेच कपडे घालून त्या सीनसाठी तयार झाली आणि अशा रीतीने तो कॅमिओ शूट झाला.

Back to top button