लगेच कोणाबद्दल मत नोंदवणे चुकीचे | पुढारी

लगेच कोणाबद्दल मत नोंदवणे चुकीचे

अभिनेता अरबाज खान सध्या त्याच्या ‘द ‘इन्विन्सिबल्स’ या शोमुळे चर्चेत आहे. यात अरबाजने त्याच्या कुटुंबाबाबत मोठी माहिती दिली आहे. शोमध्ये अरबाजने वडील सलीम खान यांनी हेलन यांच्यासोबत दुसरे लग्न केल्यानंतर घरात कसे वातावरण होते याबद्दल सांगितले आहे. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अरबाज म्हणाला, वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर आम्हाला आमच्या आईसाठी वाईट वाटत असे. पण, वडिलांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सन्मान दिला. एक कुटुंब म्हणून त्यांनी आमचा स्वीकार केला. त्यानंतर कालांतराने आम्हीदेखील हेलन यांचा कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकार केला. त्यांनीदेखील काही वेगळ्या परिस्थितीचा सामना केल्यानंतर त्यांनाही वाटले की, कोणाबद्दल असे मत मांडायला नको. आता आम्हाला कळाले की, तेव्हा अनेक तक्रारी आम्ही वडिलांकडे केल्या. त्यामुळे आता असे वाटते, कोणाबद्दल आपले मत नोंदवायला नको.

Back to top button