'कोण होणार करोडपती'चे नवे पर्व लवकरच | पुढारी

'कोण होणार करोडपती'चे नवे पर्व लवकरच

मुंबई : करोडपती होण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात; पण सर्वसामान्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे. स्वबळ आणि ज्ञानाच्या मदतीने मिळणाऱ्या यशाची चव चाखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा; कारण लवकरच येत आहे ‘कोण होणार करोडपती’चे पुढचे पर्व. धनलक्ष्मी, प्रतिष्ठा आणि प्रेक्षकांची मने जिंकण्याची हीच वेळ आहे. ‘कोण होणार करोडपती’ या जगविख्यात

कार्यक्रमाच्या या पर्वामध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे. यावर्षी स्पर्धकांना मिस्डकॉल दोन कोटी रुपये जिंकण्याची संधी आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. खेडेकर उत्तम अभिनेते तर आहेतच; पण स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे कामही ते मोठ्या कौशल्याने करत असतात. त्यामुळे स्पर्धेतील सहभागी स्पर्धक आत्मविश्वासाने आणि चांगल्या प्रकारे खेळू शकतात. यावर्षी सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्पर्धकांना १४ दिवसांत १४ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. जितके प्रश्न तितक्याच संधी. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २ मार्चपासून नोंदणी सुरू झाली आहे. २ मार्च ते १५ मार्चपर्यंत रोज एक प्रश्न असे १४ प्रश्न विचारले जाणार आहेत. ७०३९०७७७७२ या क्रमांकावर मिस्डकॉल अथवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन नोंदणी करता येणार आहे.

 

Back to top button