Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलचा एमएमएस व्हायरल, अज्ञातावर गुन्हा | पुढारी

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलचा एमएमएस व्हायरल, अज्ञातावर गुन्हा

पुढारी ऑनलाईन डेस्क : लावणी डान्सर गौतमी पाटील हिचा एक एमएमएस व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Gautami Patil ) एका कार्यक्रमासाठी चेंजिंग रुममध्ये कपडे बदलताना हा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.  (Gautami Patil ) या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला आहे.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट केलं आहे. आयोगाने पोलिसांना ‘महिलांविरोधात सायबर गुन्हे रोखण्यासाठी एक ॲक्शन प्रोग्रॅमची जाहीर’ करण्यासाठी त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, एका महिलेने पोलिसात यांबाबत तक्रार दिली आहे. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात आले आहे. आता पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

 

Back to top button