‘साजन’साठी ही अभिनेत्री होती पहिली पसंती | पुढारी

‘साजन’साठी ही अभिनेत्री होती पहिली पसंती

साजन चित्रपट हा बॉलीवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका होत्या; मात्र माधुरी दीक्षित पहिली पसंती नव्हती. दिग्दर्शक आधी लॉरेन्स डिसूझाने 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आयेशा जुल्काला या चित्रपटासाठी साइन केले होते. आयेशा त्या काळात ‘जो जिता वही सिकंदर’, ‘खिलाडी’ आणि ‘हिम्मतवाला’ या यशस्वी चित्रपटांमुळे चर्चेत होती. आयशानेही चित्रपट साइन केला आणि शूटिंग सेटवर पोहोचली होती, पण सेटवरच तिची तब्येत बिघडली. आयेशाला खूप ताप आला आणि तिची प्रकृती इतकी बिघडली की तिला चित्रपटाचे शूटिंग चालू ठेवणे शक्य नव्हते. तिची तब्येत पाहून निर्मात्यांनी मुख्य भूमिकेसाठी माधुरी दीक्षितशी संपर्क साधला. चित्रपट सुपरहिट ठरला आणि माधुरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Back to top button