मी तुला प्रत्येक ठिकाणी शोधते, जान्हवीची पोस्ट व्हायरल | पुढारी

मी तुला प्रत्येक ठिकाणी शोधते, जान्हवीची पोस्ट व्हायरल

दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची शुक्रवारी (दि. 24) पाचवी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने मुलगी जान्हवीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली आहे. जान्हवीने इन्स्टाग्रामवर आई श्रीदेवीचा फोटो शेअर करत आई तुझी खूप आठवण येत असल्याचे म्हटले आहे. जान्हवी म्हणाली, आई मी तुला आज मी प्रत्येक ठिकाणी शोधते. तुला अभिमान वाटावा असेच मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. जिथे-जिथे मी जाते, मी नेहमीच तुझा आणि तुझाच विचार करते. माझे सर्व काही तुझ्यापासून सुरू होते आणि तुझ्यापाशीच संपते. आता यावर युजर्सनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. तू ज्यावेळी सेटवर जाशील त्यावेळी तू तुझे 200 टक्के दे, असे एकाने, तर श्रीदेवी आमच्या मनात कायमच राहतील, असे दुसर्‍याने, तर तू आईची कार्बन कॉफी असून तिच्यासारखे नाव कमव, असे एका युजर्सने म्हटले आहे.

Back to top button