पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अली बाबा: दास्तान ई-काबुल' फेम अभिनेत्री तुनिषा शर्माचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शीझान खान तिच्या मृत्यूप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. Tunisha Sharma Case या प्रकरणाबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. याचदरम्यान दोन महिन्यानंतर पालघर जिल्ह्यातील वसई सत्र न्यायालयात शीझानने जामीनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. ही सुनावणी २३ फेब्रुवारीला होणार असून त्यानंतर शीझानला जामीन मंजूर होणार की नाही? हे समजणार आहे.
तुनिषा शर्मा हिच्या (Tunisha Sharma Case) मृत्यूनंतर बॉयफ्रेंड शीझानला अटक करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून तो तुरुंगात आहे. यादरम्यान पोलिस चौकशीत शीझानने अनेक गोष्टीचा खुलासा केले आहेत. आता त्याने वसई न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर २३ फेब्रुवारी २०२३ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर त्याला जामीन मिळणार की नाही? यांची माहिती मिळणार आहे. परंतु, यावेळी शीझानला जामीन मिळेल अशी शक्यता त्याच्या वकिलांनी वर्तविली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी शीझानवर ५२४ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
शीझानचे वकील शरद राय यांनी संगितले की, यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात शीझानने जामीनासाठी याचिका दाखल केली होती, परंतु, आता ही याचिका मागे घेण्यात आली असून त्याने वसई न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी ५२४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून पोलिस तपासही पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता शीझानला जामीन मिळण्याची शक्यता आहे.
शीझान खानवर को-स्टार आणि एक्स गर्लफ्रेंड तुनिषा शर्माला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपामुळे तुरुंगात आहे. तुनिषाने २४ डिसेंबर २०२२ रोजी 'अली बाबा: दास्तान ए काबुल' या टीव्ही शोच्या सेटवर गळफास घेऊन जीवन संपवले होते. यानंतर तुनिषाच्या आईने शीझानवर फसवणुकीचा आरोप केला होता. यानंतर पोलिसांनी शीझानला अटक करून त्याची चौकशी करण्यात येत होती.
हेही वाचा :