कंगना राणावतच्या मतावर चाहते म्हणाले, तो अंदाज नव्हे तर… | पुढारी

कंगना राणावतच्या मतावर चाहते म्हणाले, तो अंदाज नव्हे तर...

पुढारी ऑनलाईन : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. अशातच या प्रकरणावर कंगना राणावतचे जुने ट्विट चर्चेत आले आहे. एका युजरने कंगनाचे दोन वर्षांपूर्वीचे ट्रिट शेअर करत तिने आधीच याचा अंदाज वर्तवला होता. यामुळेच ती क्वीन आहे, असे म्हटले होते.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये जो संतांची हत्या करतो आणि स्त्रियांचा अपमान करतो, त्याचा अंत होणे निश्चित आहे. त्या युजरचे ट्विट रिट्विट करत कंगनाने ‘मी जे म्हटले होते, तो अंदाज नव्हता, तर कॉमन सेन्स होता’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. दरम्यान, कंगनाचे हे जुने ट्रिट व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर कमेंटस करत आहेत. कंगनाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Back to top button