‘पुष्पा द रूल’ लवकरच येतोय रसिकांच्या भेटीला

‘पुष्पा द रूल’ लवकरच येतोय रसिकांच्या भेटीला

अ‍ॅक्शन हीरो ही दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याची खरी ओळख. मात्र, त्याने 'पुष्पा : द राईज' या 2021 मध्ये आलेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय सामर्थ्याने रसिकांना मोहवले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग केव्हा येणार याकडे प्रेक्षकांचे डोळे लागलेले असतानाच त्याचे उत्तर समोर आले आहे. 'पुष्पा द रूल' असे या दुसर्‍या भागाचे नाव असून नुकतीच त्याची एक झलक निर्मात्यांनी सादर केली आहे. हा चित्रपटदेखील तिकीटबारीवर प्रचंड यशस्वी होईल, असा विश्वास अल्लूने व्यक्त केला आहे. सुकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना असे वाटले की, अल्लू अर्जुन याच्या वाढदिनी म्हणजे 8 एप्रिल रोजी हा चित्रपट रसिकांच्या भेटीला यावा. तेव्हा आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. येत्या 8 एप्रिलला बहुचर्चित 'पुष्पा द रूल' रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. यात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अल्लू अर्जुनचा धडाकेबाज अभिनय पाहायला मिळेल.

logo
Pudhari News
pudhari.news