Shah Rukh Khan : शाहरुखचे घड्याळ ४ कोटी ९८ लाखांचे

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान ( Shah Rukh Khan ) सध्या चर्चेत आहे. त्याचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अशीच नुकतीच एका कार्यक्रमाला शाहरुखने हजेरी लावली. त्यावेळी त्याच्या चाहत्यांच्या नजरेत भरले ते त्याचे निळ्या रंगाचे घड्याळ. तसा शाहरुख त्याच्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतोच. त्याची लक्झुरियस लाईफस्टाईल त्याच्या चाहत्यांना भुरळ घालते.

'पठाण ' चित्रपटाच्यानिमित्ताने ( Shah Rukh Khan ) त्याचे शर्टस आणि गॉगल्स चर्चेत आले होते. आता त्याच्या हातातील घड्याळाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे घड्याळ पाहिल्यावर त्याची • किंमत जाणून घेण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. ही किंमत ऐकल्यावर अनेकांनी तोंडात बोट घातले. शाहरुख खानचे हे घड्याळ Royal Oak Perpetual Calendar कंपनीचे असून घड्याळाची किंमत तब्बल ४.९८ कोटी रुपये इतकी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news