सातव्या मुलीची सातवी मुलगी ‘या’ नावामागचं रहस्य उलगडणार

satvya mulichi satvi mulgi
satvya mulichi satvi mulgi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेत्राला सातव्या मुलीची सातवी मुलगी असं का म्हटलं जातं आणि या नावामागचं रहस्य काय आहे, हे येत्या रविवारी १२ फेब्रुवारी, रोजी दुपारी १ आणि रात्री ८ वाजता, महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना कळणार आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की ममताच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, त्रिनयना देवीच्या मंदिरातील रहस्य असलेला ग्रंथ कोणी चोरला आणि राजाध्यक्ष कुटुंबातील जीवघेण्या कारस्थानामध्ये कुणाचा हात आहे.

नेत्रामुळे प्रेक्षकांना कळलं की, या सगळ्यामागे रूपाली आहे. परंतु नेत्राला हे सत्य तिच्या दिव्यशक्तीने कळलेलं असल्यामुळे तिला इतरांना समजावून सांगताना ते सिद्ध करावं लागणार आहे. रूपालीने ग्रंथातील रहस्य समजावून घ्यायला सुरुवात केल्यापासून तिच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत. तर दुसरीकडे नेत्रा अव्दैतच्या मनातील ममताबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अव्दैतसुद्धा नेत्राने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेऊन ममताच्या बाबतीत पुन्हा एकदा विचार करायचं ठरवतो.

रूपाली ग्रंथ वाचण्यासाठी हेमाची मदत घेते. त्या ग्रंथातून रूपालीला कळतं की, नेत्राला हरवणं सोपं नाही. तिच्याकडे असलेल्या दिव्यशक्तीमुळे ती आपला प्रत्येक डाव उधळून लावणार आहे. नेत्राची देवीवर गाढ श्रद्धा आणि विश्वास आहे. ग्रंथात लिहिलेल्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या ओळींपर्यंत रूपालीला अर्थ कळतो. या ओळीच्या पुढे लिहिलेलं रहस्य कळल्यावर रूपालीला आपली हार स्पष्ट दिसते.

नेत्राची आई ही सातवी मुलगी आणि नेत्रा तिची सातवी मुलगी हा या मालिकेच्या नावामागचा एक अर्थ प्रेक्षकांना माहित आहे. परंतु या नावामागचं रहस्य उलगडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news