फरहान आणि अमृताने लपवला चेहरा? नेटकरी म्हणाले… | पुढारी

फरहान आणि अमृताने लपवला चेहरा? नेटकरी म्हणाले...

मलायका अरोराची बहीण आणि अमृता अरोरा हिने नुकताच 45 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त अमृताची खास मैत्रीण करिना कपूरने तिच्या घरी खास पार्टी दिली. या पार्टीला बॉलीवूडमधील बरेच सेलिबि—टी उपस्थित होते. अर्जुन कपूर, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, मलायका अरोरा, रितेश सिधवानी यांचा यामध्ये समावेश होता. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, त्यापैकी फरहान आणि अमृताच्या एका व्हिडीओने नेटकर्‍यांचे लक्ष वेधले आहे. पापाराझींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओत फरहान आणि अमृता हे जॅकेटने त्यांचा चेहरा लपवत पार्टीतून बाहेर पडताना दिसत आहेत. गेटमधून बाहेर पडल्यानंतर हे दोघे जॅकेटने चेहरा झाकतात आणि कारच्या दिशेने चालू लागतात. त्यावर नेटकर्‍यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. असे कामच का करता ज्यामुळे तोंड लपवण्याची वेळ येते, असे एकाने लिहिले. तर हे दोघे मागच्या गेटनेही बाहेर पडू शकले असते. पुढच्याच गेटने चेहरा लपवून बाहेर पडण्याची काय गरज, असाही सवाल दुसर्‍या युजरने केला. इतका चेहरा लपवून काय उपयोग? आम्हाला कळालेच की, असेही नेटकर्‍यांनी म्हटले आहे.

Back to top button