संजूबाबाचा बेधडक लूक | पुढारी

संजूबाबाचा बेधडक लूक

दाक्षिणात्य सुपरस्टार विजयचा ‘थलापती-67’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. विजयचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमातील संजय दत्तचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. ‘थलापती-67’ या सिनेमात संजूबाबा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘केजीएफ – 2’ या सिनेमानंतरचा ‘थलापती-76’ हा त्याचा दुसरा सिनेमा आहे. यातील थलपतीचाही लूक खूपच दमदार आहे. या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सेव्हन स्क्रीन स्टुडिओच्या बॅनरखाली ‘थलापती-67’ या सिनेमाची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी या सिनेमाचं पोस्टर शेअर करत दाक्षिणात्य सिनेसृष्टीत संजय दत्तचे स्वागत केले आहे.

Back to top button