Masaba Gupta : थोडी तरी लाज बाळगा! मसाबाने पार्टनरला केले किस, नेटकरी मात्र

बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची कन्या मसाबाने नुकतेच अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर मसाबाने (Masaba Gupta) रिसेप्शन पार्टी दिली होती. त्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, पण त्यातील मसाबा आणि सत्यदीप यांच्या लिपलॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. मसाबा आणि सत्यदीप यांनी लग्नानंतर बॉलीवूड सेलिब—ेटींसाठी पार्टी दिली होती. पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. केक कापण्याच्या वेळी मसाबाने पती सत्यदीपला लिप किस केले. (Masaba Gupta)
दोघांनी एकमेकांना आधी केक भरवला आणि त्यानंतर किस केले, पण हे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यानंतर मसाबाने पुन्हा एकदा सत्यदीपला लिप किस केले आणि हे सर्व पाहून त्यांच्या मागे उभे असलेले मसाबाचे वडील रिचर्डस हसत होते.
नेटकर्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एक काळ होता जेव्हा श्रीराम वडिलांसाठी 14 वर्षे वनवासाला गेले होते, पण सध्या वडिलांच्या समोर असे किस केले जात आहे. हेच कलियुग आहे. एवढेही मॉडर्न होऊ नका. थोडीतरी लाज बाळगा. अशीही कमेंट एका युजरने केली आहे. हे हिचे दुसरे लग्न आहे? असे एकाने, तर आहा! भारतीय संस्कृती अशी दुसर्या एका युजरने कमेंट केली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram