

पुढारी ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आई झाल्यानंतर ती तंदुरुस्तीकडे सध्या खूप लक्ष देत आहे. आलिया अनेकदा योगा आणि जिम करताना दिसते. दरम्यान, आलियाचा एक वर्कआऊट व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये ती तिच्या घरी 108 सूर्यनमस्कार करताना दिसली. या व्हिडीओत आलिया खूपच क्यूट दिसत आहे.
व्हिडीओमध्ये बहीण शाहीन तिला विचारते की, तुला आता कसे वाटत आहे? त्यावर आलिया म्हणाली, पॉवरफुल. आलिया नो मेकअप लूकमध्ये खूपच क्यूट दिसत असून चेहर्यावर जबरदस्त ग्लो आहे. हा व्हिडीओ समोर येताच चाहते सोशल मीडियावर आलियाचे कौतुक करत आहेत. आलिया तू खूप क्यूट आहेस, असे एकाने तर तर दुसर्याने लिहिले की, तू मेकअप न करताही खूप सुंदर दिसतेस. आलियाच्या आगामी प्रोजेक्टबाबत बोलायचे तर आलिया लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात झळकणार आहे. तिच्यासोबत रणवीर सिंग देखील दिसणार आहे.