kl rahul-athiya shetty
मनोरंजन
अथिया – के. एल. राहुलच्या लग्नाची लगबग
आणखी एक बॉलीवूड अभिनेत्री आणि क्रिकेटरची जोडी बोहल्यावर चढण्यास सज्ज झाली आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज के. एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. राहुलच्या मुंबईतल्या घरी लग्नाची लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचा पहिला व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पापाराझींनी या घराबाहेरचे व्हिडीओ शूट केले आहेत. येत्या २३ जानेवारी रोजी राहुल आणि अथिया लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. राहुलच्या मुंबईतल्या घराला सजावट केली जात आहे. अथियाचे वडील अभिनेते सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर हे लग्न पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. २१ जानेवारीपासून या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

