web series 2023 – यंदाचे वर्ष वेब सीरिजचे | पुढारी

web series 2023 - यंदाचे वर्ष वेब सीरिजचे

यंदाचे वर्ष वेबप्रेमींसाठी धमाकेदार असणार आहे. यंदा अनेक वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. यावेळी अनेक प्रसिद्ध सीरिजचे सिक्वेल प्रदर्शित होणार आहेत.

द फॅमिली मॅन – 3 ने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सीरिजमध्ये कॉमन मॅनची अनकॉमन गोष्ट दाखवली आहे. सीरिजमधील अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या भन्नाट अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकले.

‘मिर्झापूर – 3’ लवकरच मिर्झापूर सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांच्या मनात सीरिजची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘आर्या – 3’ प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सुश्मिता सेन एका डॉनची भूमिका साकारताना दिसणार आहे. आर्याचा वेगळा अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.

Back to top button