हृतिकबाबत शब्दांची निवड चुकली : एस. एस. राजामौली | पुढारी

हृतिकबाबत शब्दांची निवड चुकली : एस. एस. राजामौली

बाहुबली, आरआरआर यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे त्यांच्या एका जुन्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांची एकमेकांशी तुलना केल्याने राजामौलींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. प्रभाससमोर हृतिक काहीच नाही असे ते म्हणाले होते. आता याच वक्तव्यावर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. राजामौलींनी त्यांची चूक स्वीकारत शब्दांची निवड चुकल्याचे म्हटले आहे. मला वाटते जवळपास 15- 16 वर्षांपूर्वी मी ते वक्तव्य केले होते. पण होय, माझ्या शब्दांची निवड चुकली होती, हे मी स्वीकारले पाहिजे. त्याला कमी लेखण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. मी त्याचा खूप आदर करतो आणि त्या घटनेला आता बरीच वर्षे झाली आहेत, असे ते म्हणाले.

Back to top button