रणबीर, रणवीरपेक्षा वेगळा! | पुढारी

रणबीर, रणवीरपेक्षा वेगळा!

बॉलीवूड अभिनेते रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांचा कामाकडे बघायचा दृष्टिकोन प्रचंड वेगळा आहे. नुकतेच सिनेअभ्यासक तरण आदर्श यांनी दोघांविषयी भाष्य केले आहे. या दोघांमधला नेमका फरक त्यांनी सांगितला आहे. 2022 मध्ये रणबीर कपूरचे 2 चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी एक ‘शमशेरा’ सुपरफ्लॉप ठरला, तर ‘ब—ह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. रणवीर सिंहचे मात्र 83, जयेशभाई जोरदार आणि नुकताच आलेला सर्कस हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. यामागचे नेमके कारण तरण यांनी सांगितले आहे.

तरण म्हणाले, रणबीरने स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवले. तसेच तो सार्वजनिक कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये फार कमी दिसतो. विमानतळावरचे त्याचे लुक्स व्हायरल होत नाही, त्याने चाहत्यांच्या मनातील स्वतःबद्दलची उत्सुकता कायम ठेवली आहे.

दुसरीकडे रणवीर मात्र प्रत्येक इव्हेंटमध्ये दिसतो, त्याचे सोशल मीडिया पोस्ट, विमानतळावरील लूक व्हायरल होतात, टीव्हीवरील असंख्य जाहिरातीत दिसतो, आणि जेव्हा त्याचा चित्रपट येतो तेव्हा ती उत्सुकता प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. रणबीरकडचा हा गुण रणवीरकडे नाही.

Back to top button