आर आर आर बॉलीवूडपट नाही!

सध्या जगभरात ‘आर आर आर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याची जोरदार चर्चा होत आहे. या गाण्याला नुकताच प्रतिष्ठेचा ग्लोडन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. जगभरातील चाहत्यांनी या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच काही लोक या गाण्याला खूप साधारण म्हणत आहेत आणि त्यांच्या मते याला एवढा मोठा सन्मान मिळायला नको होता. दरम्यान, आता राजामौली यांनी यावर मौन सोडले आहे. ‘आर आर आर’ हा बॉलीवूड चित्रपट नाही. हा दक्षिण भारतातील एक तेलुगू चित्रपट आहे, जिथून मी आलो आहे. पण चित्रपट थांबवण्यापेक्षा कथा पुढे नेण्यासाठी मी गाणी करतो. चित्रपटाच्या शेवटी तुम्ही म्हणाल की मला तीन तास तसे वाटले नाही, तर मला माहीत आहे की, मी एक यशस्वी चित्रपट निर्माता आहे. रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांचा हा चित्रपट एका निर्भय योद्ध्याची कथा सांगतो. जो स्वातंत्र्यपूर्व भारतातील एका महाकाव्यात बि—टिश सैन्याची सेवा करणार्या एका चोखंदळ पोलिसाच्या समोर येतो, असे राजामौली म्हणाले.