kili paul : किली-निमा पॉललाही लागलं रितेश देशमुखचं ‘वेड’ (Video) | पुढारी

kili paul : किली-निमा पॉललाही लागलं रितेश देशमुखचं 'वेड' (Video)

मुंबई : बॉलीवूडच्या हिंदी गाण्यावर रील बनवून सोशल मीडियावर तुफान प्रसिद्ध झालेल्या टांझानियातील सोशल मीडिया स्टार किली पॉलने आता मराठी आणि भोजपुरी गाण्यावर रील बनवले आहे. (kili paul ) त्याचे व्हिडीओ हिट होत आहेत. त्याने रितेश देशमुखच्या मराठी गाण्यावर तसेच भोजपुरीतील प्रसिद्ध ‘लगावेलु तु लिपस्टिक’ या गाण्यावर रील बनवले आहे. किलीचे भारतात लाखो
फॅन्स आहेत. (kili paul )

अभिनेता रितेश देशमुखचे ‘वेड लावलंय’ हे गाणं सध्या चांगलंच गाजायला लागलंय. त्यामुळे सोशल मीडियावर या गाण्यावर लाखो ल बनवले जात आहेत. सातासमुद्रापार टांझानियातील सोशल मीडिया स्टार किली पॉल यालासुद्धा या गाण्याने वेड लावले असून त्यानेही यावर रील बनवले आहेत. या रीलमध्ये तो एका शेतात हूक स्टेपवर डान्स करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. हे व्हिडीओ त्याने रितेश, जेनेलिया आणि सलमान खान यांना टॅग केले आहेत. रितेशने त्याच्या या रीलवर ‘लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे. अलीकडेच बिग बॉस १६ मध्ये किलीला स्पेशल गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

Back to top button