RRR Rajamouli : दिग्दर्शक राजामौलींचा ‘बॉलिवूड’ला टोला, म्हणाले; ‘'RRR' हा...’ | पुढारी

RRR Rajamouli : दिग्दर्शक राजामौलींचा ‘बॉलिवूड’ला टोला, म्हणाले; ‘'RRR' हा...’

पुढारी ऑनलाईन डेस्क : RRR Rajamouli : ‘आरआरआर’ (RRR)मधील नाटु नाटु या गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी मोठे विधान केले आहे. ‘RRR’ हा बॉलिवूड चित्रपट नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. माझ्या चित्रपटांमधील गाणी ही फक्त संगीत आणि नृत्यासाठी नसतात. तर चित्रपटाला पुढे नेण्यासाठी असतात, असेही त्यांनी सांगितले.

गोल्डन ग्लोबच्या स्क्रीनिंग दरम्यान राजामौली म्हणाले की, ‘RRR हा बॉलीवूड चित्रपट नाही. तो दक्षिण भारतातील तेलगू चित्रपट आहे जिथून मी आलो आहे. मी संगीत आणि नृत्य हे कथेत व्यत्यय आणण्याऐवजी ती पुढे नेण्यासाठी वापरतातो, असे स्पष्ट केले.

अलीकडेच RRR मधील गाणे नाटु नाटुने सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत गोल्डन ग्लोब 2023 पुरस्कार जिंकला. या गाण्याने ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ मधील रिहानाच्या ‘लिफ्ट मी अप’ आणि ‘व्हेअर द क्राउड सिंग्स’मधील टेलर स्विफ्टच्या ‘कॅरोलिना’ला मागे टाकले.

ऑस्करमध्ये RRR

गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर, ‘RRR’ ऑस्कर 2023 मध्ये पुरस्कार जिंकेल अशी अपेक्षा आहे. आरआरआरला जगभरातील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. त्याच वेळी, जेव्हा ऑस्करच्या सदस्यांसाठी ते प्रदर्शित केले गेले तेव्हा लोकांनी उभे राहून त्याचा आदर केला.

Back to top button