Rakhi Sawant : दुसर्‍या लग्नानंतर राखीला वाटतेय ‘लव्ह जिहाद’ची भीती | पुढारी

Rakhi Sawant : दुसर्‍या लग्नानंतर राखीला वाटतेय ‘लव्ह जिहाद’ची भीती

टीव्हीची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत तिच्या ‘दुसर्‍या लग्ना’मुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. असे सांगितलं जाते की, तिने प्रियकर आदिल खान दुर्रानीशी लग्न केले असून इस्लाम धर्मही स्वीकारला. आता ती फातिमा झाली आहे. तिने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सांगितले की, त्यांनी सात महिन्यांपूर्वीच कोर्ट मॅरेज केले होते. मात्र, याबद्दल गुप्तता ठेवण्यासाठी आदिलने तिच्यावर दबाव आणला होता. तिला आता ‘लव्ह जिहाद’ची भीती वाटू लागली आहे. कारण, आदिलचे कुटुंबीय तिच्यावर खूप दबाव टाकत आहेत. त्यामुळे तो तिच्याशी बोलत नाही. एवढेच नव्हे तर आदिल दुसर्‍या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही राखीने केला आहे. यातील नवा ट्विस्ट म्हणजे आपण अजून राखीशी लग्नच केलेले नाही, असे आदिलने म्हटले आहे. आता यातील खरे काय नि खोटे काय हे देवालाच माहीत.

Back to top button