जॅकी चॅन : संपत्तीचे थरांवर थर, पण लेक आहे बेघर | पुढारी

जॅकी चॅन : संपत्तीचे थरांवर थर, पण लेक आहे बेघर

अभिनेता जॅकी चॅनची गणना जगभरातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत केली जाते. तो तब्बल 520 मिलियन डॉलरच्या संपत्तीचा मालक आहे. तरीही त्याच्या मुलीकडे राहायला घर नाही आहे. याचे कारण म्हणजे विवाहबाह्य संबंध. यातून त्याला एक मुलगी झाली. तिचे नाव एटा. त्यामुळे तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एटाच्या जन्मानंतर तिला वडिलांचे प्रेम कधी मिळालेच नाही. काही दिवसांपूर्वी एटाने एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये ती म्हणते, वडिलांच्या विवाहबाह्य संबंधामुळे आज मी बेघर आहे. दरम्यान, जॅकीने एका मुलाखतीत सांगितले होते की, खरे तर एटाला माझ्या संपत्तीची कसलीच गरज नाही. काही गोष्टींबद्दल न बोलणेच योग्य असते. मात्र, एटाला कधी माझी गरज असेल तर मी नक्कीच तिला मदत करेन.

Back to top button