उर्फीनं चांगले कपडे घालून महिला आयोगात जावं; चित्रा वाघ यांचा टोला

उर्फीनं चांगले कपडे घालून महिला आयोगात जावं; चित्रा वाघ यांचा टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम उर्फी जावेदने चांगले कपडे घालून महिला आयोगात जावं, सार्वजनिक ठिकाणी नंगानाच आम्हाला मान्य नाही, असे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे. त्या आज शुक्रवारी (दि.१३) सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

उर्फीच्या वागण्याला माझा कालही विरोध होता आणि उद्याही राहणार आहे. स्वातंत्र्याच्या नावावर चाललेला स्वैराचार खपवून घेणार नाही, आमचं भांडण उर्फीच्या विकृतीशी आहे. हा राजकारणाचा विषय नाही, समाजात असणाऱ्या विकृती घटल्या पाहिजेत, ऐवढे झाल्यानंतर आतातरी उर्फीने चांगले कपडे घालून महिला आयोगात जावं असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

तर महिला राज्य आयोगाच्या रूपाली चाकणकरांना नंगानाच मान्य आहे का? असा प्रश्नदेखील चित्रा वाघ यांनी विचारला आहे. या सगळ्यांनी एकत्रित येऊन लढले पाहिजे, विरोधाला विरोध करा मला नको. यात कोठेही राजकारण नाही. परंतु, हे सर्व राजकारणाशी जोडले जाते याचा मला त्रास होतोय, मी कोणालाही घाबरत नाही, काय करायचे ते करा. शेवटी त्यांनी उर्फीचा नगांनाच महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असेही म्हटलं आहे.

हेही वाचंलत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news